सहजता ☺

सहज घरातुन बाहेर पडाव,
सहज खिडकीतून कधीतरी डोकावुन बघावं
आणि सहजच तुझ्याकडे बघून हसावं
ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहज आहेत ना
की कधी हवेची हलकीशी झुळूक मला स्पर्श करून जाते
हे सुद्धा आजकाल मला सहज वाटून घेण्यापूर्वी विचार करावा लागतो.....

सहजच भेटलो होतो आपण
कारण काय होत मला अजिबात लक्षात नाहीए...
असो..... काही गोष्टी सहजच बऱ्या असतात
सहजच मैत्रिपण झाली
सहजच भेटी वाढल्या ...
सहजच माझा मातीपासून ते नभापर्यंत बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला....
नंतर सगळ्याच गोष्टीत सहजता आली...
म्हणून मी किंचित का होईना पण अडथळे शोधायला लागली...
सहजतेचा कंटाळा यायला लागला रे....

सहजता आली की नक्की गडबड आहे अशी भावना मनात घर करते ....
सवय नाही ना ....एवढं सहज आयुष्य जगायची...
सहजच भेटताना आपण प्रेम इतक्या सहजतेने व्यक्त केलं की सहजपणे आयुष्यात काय चाललंय यावर विश्वास होईना ....
म्हणून वाटलं सहजच सांगावं जगाला ...किती सहजतेने सगळं काही पुढे सरसावत गेलं ...
इतक्या सहजपणे चाललेल्या कथेत तितक्याच सहजतेने खिंड पडली
आणि सहजतेची माझी व्याख्या कुठेतरी कोपऱ्यात जाऊन हुंदके देत  रडली!!!

मोनिका ☺


Comments

Popular posts from this blog

Box

Abstract

Heart or Brain