न लिहलेल पत्र , आई , एक सांगू का ? खूपदा मनातल सांगायच असत गं, पण वाटते तू उगाच चिंता करशील ...... एकट वाटते गं कधी कधी...मन शांतच होत नाही. फोन हातात घेउन परत ठेउन देते मी. कारण मला वाटते तू उगाच चिंता करशील ..... कधी येणार घरी नेहमी विचारतेस....अस वाटते सांगुन दयाव की मला आधी पास होऊ दे कारण एखादया विषयाची भीती असते कधी कधी ..नंतर येईलच घरी.पण वाटते तू उगाच चिंता करशील म्हणुन काहिही कारणं सांगते मी ... आई, खर सांगु का कधी कधी खूप भीती वाटते मला ... मैत्रीणी आजूबाजुला असतानाही एकांतवास का मनात घर करतो माहित नाही गं ....फोन करून भाड भाड रडाव वाटते गं .....पण वाटते तू उगाच चिंता करशील ..... खूपदा मेसच जेवण नकोस वाटत...पण उपाय नसतो गं ... तू खूप मेहनती ने मोठ केलस मला ...तुझे विचार मनात पेरले . तेच विचार व्यक्त केले की लोक Feminist म्हणतात मला ...मला एक सांग दादाने विचार मांडले ...