ती सध्या काय करते ❤

कॉलेज संपून माझे चार वर्ष झाली
अलगद मनात मला तिची आठवण आली😍
विसरून गेलो होतो तीला
पण मन अजूनही झुरते
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....

टपोरे टपोरे डोळे तीचे
आणि निखळ हसू 😃
वाटल नव्हत एका हास्यात
आपण सहजच फसू
ती चूक अजूनही माझ्या मनात मुरते🤗
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....

तिला पाहिल की दिवस एकदम छान जायचा
भुरळ पडली मनाला याचा अंदाज नसायचा
अचानक दिसली तीच्या सारखी कुणी
अजूनही धडकी भरते 😮
नेहमीच विचार येतो मनात 
ती सध्या काय करते.....

सुटत गेल हातून सगळ
उरल काहीच नाही
तीला जगायच होत मनसोक्त
मला भरारीची घाई
भरारी घेतानाही पंखांना बळ द्यायला कुणीतरी लागते
नेहमीच विचार येतो मनात 
ती सध्या काय करते..... 

ना सोडून गेलो मी 
ना सोडून ती  गेली 
स्वप्नांनी आमच्या विरहाची 
परवाच नाही केली 😞
दुरावा मिटवण्यासाठी भेट महत्वाची ठरते 
नेहमीच विचार येतो मनात 
ती सध्या काय करते..... 

वाटल नव्हत मला कधीच 
दुरावतील रस्ते असे
दूर गेल्यावर ती मला 
कसलेच भान नसे 
एका कटाक्षासाठी तीच्या अजूनही मन तड़फड़ते

नेहमीच विचार येतो मनात 

ती सध्या काय करते.....

कुठे असेल ,कशी  असेल 
प्र्।श्नांच वादळ येत मनात 
कधी कधी मन भीजत आसवांच्या उन्हात 
भेटेल का ती पुनः मला याची आशा 
मनात घर करते
नेहमीच विचार येतो मनात 
ती सध्या काय करते.....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Box

Abstract

Heart or Brain