स्वप्न

असंख्य आहेत स्वप्न 
असंख्य अभीलाषा 
आजकाल स्वप्नांचीही 
कळते मजला भाषा 

थकली आहेत बिचारी 
असंख्य चालून वाटा 
अनवाणी फिरताना 
टोचला पायात काटा 

दूर दूर जाताना 
तिमीराची भीती 
क्षितिजाकडे जाताना मात्र 
मंदावली गती

कळसाच्या स्पर्शाची 
घाई यांना सदा
घामाळलेल्या स्वप्नांना 
शिखर दिसावे एकदा !!!

Comments

Popular posts from this blog

Box

Abstract

Heart or Brain